काटा : Kata


कधी काटाही बोलतो मनातलं,



समोर का अबोल मी - Samor Ka Abol Mi

समोर असूनही अबोल मनाची घालमेल....

वेळ नाही आरशाला...Vel Nahi Arshala

वेळ नाही आरशाला...
जेंव्हा आठवणींच्या बेड्या पाय घट्ट धरून ठेवतात आणि तरीही चालायचं असतं,
माहित नाही कुठे आणि कुठवर????




सागरा प्राण तळमळला ( Sagara Pran Talmalala)


सागरा प्राण तळमळला
ने मजसी ने परत मातृभूमीला
सागरा प्राण तळमळला ॥धृ॥
भूमातेच्या चरणतला तुज धूतां 
मी नित्य पाहिला होता 
मज वदलासी अन्य देशी चल जाऊं 
सृष्टिची विविधता पाहूं 
तइं जननीहृद् विरहशंकितही झाले 
परि तुवां वचन तिज दिधले 
मार्गज्ञ स्वये मीच पृष्ठिं वाहीन 
त्वरित या परत आणीन 
विश्वसलो या तव वचनीं  मी
जगदनुभवयोगें बनुनी  मी
तव अधिक शक्त उद्धरणीं  मी
येइन त्वरेकथुन सोडिले तिजला
सागरा प्राण तळमळला   
शुक पंजरि वा हरिण शिरावा पाशीं 
ही फसगत झाली तैशी 
भूविरह कसा सतत साहुं यापुढती 
दशदिशा तमोमय होती 
गुणसुमनें मी वेचियली या भावें 
की तिने सुगंधा घ्यावें 
जरि उद्धरणी व्यय  तिच्या हो साचा 
हा व्यर्थ भार विद्येचा 
ती आम्रवृक्षवत्सलता  रे
नवकुसुमयुता त्या सुलता  रे 
तो बाल गुलाबहि आतां  रे
फुलबाग मलाहाय पारखा झाला 
सागरा प्राण तळमळला   


--विनायक दामोदर सावरकर

खरा तो एकची धर्म - साने गुरुजी (Khara To Ekachi Dharm - Sane Guruji)


खरा तो एकची धर्म 

खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे

जगी जे हीन अतिपतितजगी जे दीन पददलित तया जाऊन उठवावेजगाला प्रेम अर्पावे

जयांना ना कोणी जगती सदा ते अंतरी रडती तया जाऊन सुखवावेजगाला प्रेम अर्पावे

समस्तां धीर तो द्यावासुखाचा शब्द बोलावा अनाथा साह्य ते द्यावेजगाला प्रेम अर्पावे

सदा जे आर्त अतिविकलजयांना गांजती सकल तया जाऊन हसवावेजगाला प्रेम अर्पावे

कुणा ना व्यर्थ शिणवावेकुणा ना व्यर्थ हिणवावे समस्तां बंधु मानावेजगाला प्रेम अर्पावे

प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी कुणा ना तुच्छ लेखावेजगाला प्रेम अर्पावे

असे जे आपणापाशी असेजे वित्त वा विद्या सदा ते देतची जावेजगाला प्रेम अर्पावे

भरावा मोद विश्वात असावे सौख्य जगतात सदा हे ध्येय पूजावेजगाला प्रेम अर्पावे

असे हे सार धर्माचे असे हे सार सत्याचे 
परार्थी प्राणही द्यावेजगाला प्रेम अर्पावे

जयाला धर्म तो प्याराजयाला देव तो प्यारा त्याने प्रेममय व्हावेजगाला प्रेम अर्पावे

साने गुरुजी 

अस्सल मराठी म्हणी......(Assal Marathi Mhani)


अस्सल मराठी म्हणी...... 
1. अंगात नाही बळ आणि चिमटा घेउन पळ.
2. 
अंथरूण पाहून पाय पसरावेत.
3. 
अंधळं दळतं अऩ कुत्र पिठ खातं.
4. 
अक्कल नाही काडीची नाव सहस्त्रबुद्धे.
5. 
अक्कल खाती जमा.
6. 
अक्कल नाही काडीची म्हणे बाबा माझे लग्नं करा.
7. 
अग अग म्हशीमला कुठे गं नेशी.
8. 
अठरा विश्व दारिद्र त्याला छत्तीस कोटी उपाय.
9. 
अडला हरी गाढवाचे पाय धरी.
10. 
अडली गाय खाते काय.
11. 
अडाण्याचा गेला गाड़ावाटेवरची शेते काढा.
12. 
अती झालं अऩ हसू आलं.
13. 
अती झाले गावचे अन पोट फुगले देवा
14. 
अती शहाणा त्याचा बैंल रिकामा.
15. 
अवघड ठिकाणी दुखणे आणि जाव डॉक्टर.
16. 
असतील मुली तर पेटतील चुली.
17. 
आंधळीपेक्षा तिरळी बरी.
18. 
आठ हात लाकुड हात धलपी.
19. 
कर नाही त्याला ड़र कशाला?
20. 
करायला गेलो एक आणि झाले भलतेच.
21. 
करावे तसे भरावे.
22. 
कळते पण वळत नाही.
23. 
कशात काय अन फाटक्यात पाय.
24. 
कशात ना मशातमाकड तमाशात.
25. 
कष्ट करणार त्याला देव देणार.
26. 
काम  धंदाहरी गोविंदा.
27. 
कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच.
28. 
गंगा वाहते तोवर हात धुवून घ्यावे.
29. 
गाढवं मेलं ऒझ्याने अन शिगरू मेलं हेलपाट्याने.
30. 
गुरवाचे लक्ष निविद्यावर (नैवेद्यावर).
31. 
चव ना ढव म्हणे खंडाळ्या पोटभर जेव.
32. 
चांदणे चोरालाउन घुबडाला.
33. 
चांभाराची नजर जोड्यावर.
34. 
चुकलेला फकीर मशिदीत.
35. 
चोर तो चोर वर शिरजोर.
36. 
चोर नाही तर चोराची लंगोटी.
37. 
चोर सोडून संन्याशाला सुळी.
38. 
चोराच्या उलट्या बोंबा.
39. 
चोराच्या मनांत चांदणं.
40. 
चोराच्या वाटा चोरालाच माहीत.
41. 
चोरावर मोर.
42. 
चोरीचा मामला हळू हळू बोंबला.
43. 
जशास तसे.
44. 
जशी कामना तशी भावना.
45. 
जशी देणावळ तशी धुणावळ.
46. 
जशी नियत तशी बरकत.
47. 
जसा गुरु तसा चेला.
48. 
जसा भाव तसा देव.
49. 
जाईचा डोळा नि आसवांचा मेळा.
50. 
जातीसाठी खावी माती.
51. 
जावयाचं पोर हरामखोर.
52. 
जिकडे पोळी तिकडे गोंडा घोळी.
53. 
जिकडे सु तिकडे दोरा.
54. 
जिच्या घरी ताक तिचे वरती नाक.
55. 
जेथे पिकतं तिथे विकतं नाही.
56. 
जो नाक धरीतो पाद करी.
57. 
जो श्रमी त्याला काय कमी.
58. 
ज्याला नाही अक्कल त्याची घरोघरी नक्कल.
59. 
ज्वारी पेरली तर गहू कसा उगवणार?
60. 
तवा तापला तोवर भाकरी भाजून घ्यावी.
61. 
तहान लागल्यावर आड खणणे.
62.
ताकापुरते रामायण.

कविता : गाव मी शोधू कुठे? ( Gav Mi Shodhu Kuthe?)

काहीतरी राहिलंय......
-------------------------------------------------------------------------------------------------

कविता : तहान (Kavita : Tahan)

एका छोट्याश्या पक्षाची पाण्यासाठी होणारी परवड...


कविता : छत्रपती संभाजी राजे (Chhatrapati Sambhaji Raje)

छत्रपती संभाजी राजे - आपला लाडका राजा 



माझ्या प्रेम कविता - My Love Poems

समोर असूनही अबोल मनाची घालमेल....


-----------------------------------------------------------------------------------------------
आणि जेंव्हा तिच्याशिवाय जगता येत नाही....

-----------------------------------------------------------------------------------------------------


तिनं त्याचं प्रेम समजून घ्यावं....
-------------------------------------------------------------------------------------------------
विरह......
------------------------------------------------------------------------------------------------
काय मग,
कशा वाटल्या कविता...?
आपल्या सूचना, अभिप्राय कळू द्या, काय?

I am on Facebook,
http://www.facebook.com/profile.php?id=100001181729001

नसतेस घरी तू जेव्हा - मौनाची भाषांतरे, संदिप खरे (Nastes Ghari Tu Jenvha - Sandip Khare)

नसतेस घरी तू जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो

नभ फाटून वीज पडावी
कल्लोळ तसा ओढवतो
ही धरा दिशाहीन होते
अन् चंद्र पोरका होतो

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे
खिडकीशी थबकून वारा
तव गंधावाचून जातो

एकाकी केविलवाणा
मी घरभर भिरभिर फिरतो
घुमघुमत्या आवाजाने
भिंतींना हाका देतो

तव मिठीत विरघळणार्या
मज स्मरती लाघववेळा
श्वासाविन हृदय अडावे
मी तसा आकंतिक होतो

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा ?
समईचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो

ना अजून झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो !

- मौनाची भाषांतरे, संदिप खरे

मी गर्दीत वाट हुडकतोय................Very good liked to share

हे लिखाण माझं नाही पण मस्त आहे


मी गर्दीत वाट हुडकतोय.................
रोज सकाळ होते, मी जागा होतो, पूर्वीही सकाळ व्हायची मी जागा व्हायचो.
उठून शाळेत जायचो, गर्दीत सामील व्हायचो, बे एके बे पासून १० वि पर्यंत मी गर्दीत चालत राहिलो,
लोक वक्तृतव स्पर्धेत भाग घेतात म्हणून मी ही घेत राहिलो, आणि अमुक एक क्लास चांगला आहे म्हणून मी पण जात राहिलो.
शाळा झाली, सगळे ११ वी / १२ वी करतात म्हणून मी ही केली, सगळे जण ढीग भरून फॉर्म भरतात म्हणून मी ही भरत राहिलो.
शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो. ........................
१२ वी नंतर सगळे कंप्यूटर क्षेत्रात जातात म्हणून मी पण गेलो.
अमुक यांचा तो आणि तमुक यांची ती सध्या एमनसी कंपनीमधे असते , इतके हजार पगार मिळतो हे ऐकत राहिलो, मी पण त्यांच्यातलाच व्हायच्या तयारीला लागलो.
अरे तो यूएस ला गेला, हा यूके हून आला , तो युरोप मधे सेट्ल झला हे ऐकत मी पण इंजिनियर होत गेलो. सगळे कॅम्पस मधे जातात तसा मी पण गेलो आणि पुन्हा एकदा त्याच गर्दीत एक दिवस सॉफ्टवेर इंडस्ट्री मधे उभा राहिलो.
शेवटी काय मी पण गर्दीत चालत राहिलो............................
लहान पणापासून गर्दीचा संस्कार झालेला मी असाच आयुष्यात वाहत गेलो.
माझेही इंडक्षन झाले , काम झाले, कष्ट झाले , अप्रेज़ल झाले, मॅनेजर ला शिव्या देणे झाले, ३/४ स्विच झले, पॅकेज वाढले.
मी एक पक्का सॉफ्टवेर इंजिनियर झालो. मी पुर्वी पंकज द्वारकानाथ मोहोटकर मधला "पन्या / पंक्या" होतो आता "पी. एम." झालो आहे. आता सगळ्या गोष्टी पैश्यात मोजू लागलो आहे.
एक दिवस लक्ष्यात आले की मी गर्दीत आहे खरा, पण मला कोणी जवळचा नाही, वीकेंडला रस्त्यात कुठे भेटेल तिथे उभे राहून माझ्याबरोबर ३/४ तास गप्पा मारणारा मित्र नाही.
मी पण आता अगदी मित्रच नसले तरी पण कलीग बरोबर रिकामा वेळ घालवतो, वीकेंड ला फालतू गप्पा आणि लंच/ डिनरसाठी तडफडतो.
घरात पण मी नसतो कारण रोज १२ / १३ तास गर्दीत असतो, २ दिवस मिळतात म्हणून घरातले वीकेंड ला मला “जाउ दे त्याला निवांत” महणून सोडून देतात. असा मी आज काल गर्दीत असलो तरी एकटाच असतो.
आज काल मी टिपिकल सॉफ्टवेरवाला झालो आहे, माझी कंपनी, माझे पॅकेज, माझे डेसिग्नेशन, माझा वेरियबल, माझा बुक केलेला फ्लॅट, त्याचे प्रोग्रेस मधील फोटो, माझी यूके वारी त्याचे तेच ते पकाव पीकासा वरचे आल्बम, माझी कार………..सगळ्याना दाखवत बसतो…. पण का काही कळत नाही कुठे तरी मनात कुरकुरतो, …....
मला ढीग भरून स्क्रॅप येतात, ऑरकूट / फेसबुक वर शेकडो फ्रेंड्स भेटतात, सगळे स्क्रॅप शेवटी केरात जातात आणि फ्रेंड्स हे फक्त फ्रेंड्स राहतात. त्यातलाच कोणी काय भावा कुठे असतोस ये की चा मारू हे बोलत नाही, आणि आज काल आई-आप्पा  कुठं तुझ्याकड की गावाकड असले प्रश्न पण विचारत नाही. कोणी फोन करून लेका गावाकड ये कि एकदा, किंवा यंदा तरी जत्रेला ये कि भावा असे पण म्हणत नाही,
मला कोणीच ऑरकूट वरचा ये की मर्दा घराकड एकदा जेवाय असे पण म्हणत नाही,आम्ही ढीग आउटिंग /पार्ट्या करतो पण त्याची मजा यात नाही. गावाकडे आहेत काही मित्र, पण मी तिकडे जात नाही, आज कुठे तरी हुरहूर वाटते आहे की मी माझे पक्के दोस्त गमावल्याचे, ते गावाकडचे असले म्हणून काय झाले त्या हाकेसारखी आर्तता इथल्या फ्रेंड्सच्या इंवीटेशन मध्ये जाणवत नाही.
लोकही माझे मेल/स्क्रॅप/ पीकासा आल्बम पाहतात आणि ते पण; “च्यायला हा ऑनसाइट जाऊन आला वाटते” असे म्हणत फोटो न बघता लॉग ऑफ मारतात , त्याना फार आवड नसते बघायची, एखादा कॉमेंट टाकून बस गर्दीचा नियम पाळत असतात.
गर्दीत राहून पण मी आज एकटा आहे………नावाला फक्त लोक गर्दीत उभे आहेत, आयुष्यात एक वेळी अशी येते की ही गर्दी कामात येत नाही, कलीग म्हणणारे तुमचे जवळचे तुमच्या सुखात नक्की एन्जॉय करायला येतील, पण दुखा:च्या वेळची ग्यारेंटी नाही. पण तुम्ही सुधा दु:खी व्हाल, त्या वेळेला कलीग, डिलीवरेबल्स, मीटिंग्समधे व्यस्त असतील आणि वीकेंड ऑलरेडी प्लान झाला रे.... सॉरी... असे म्हणत कलटी टाकतील. सॉफ्टवेर वाला झाला म्हणून काय?? दु:ख कधी तरी येतेच त्याला तुम्ही इंस्टालमेंट अमाउंट देऊन टाळू शकत नाही. प्रत्येक अडचण पैश्याने सोडवता येत नहीं.
अश्या वेळी लागतात ते फक्त मित्रच, जे बिचारे कधी कलीग नसतात अणि ते कुठल्याच गोष्टी पैश्यात मोजत नसतात.
मी विचार करतो की मी या गर्दीत का चालत राहिलो??सगळे करतात तेच बरोबर असेल , जे काय व्हायचे ते सगळयांचे होईल, या गर्दीच्या फुटकळ तत्वावर विश्वास ठेवत राहिलो.
काय असते ही गर्दी? इयत्ता १ ली ते …..इंटरव्यू राउंड पर्यंत काय करते ही गर्दी?? कोण ठरवतो यांची दिशा? या गर्दीत कोणच कुणाला ओळखत नाही......पुढचा चालतो म्हणून मागचे चालतात..आणि मागे खूप लोक आहेत म्हणून पुढचा चालत राहतो.
आपण जगत नाही आहोत आपण आपल्याला जगवत आहोत, कशासाठी ते कुणालाच माहीत नाही, मी माझे वैयक्तिक आयुष्य विसरत चाललो आहे का? मला पक्के मित्र मिळत नाहीत का? का मीच त्या वाटेला जात नाही. विचार करून डोके दुखु लागले , उपाय म्हणून कायतर मशीन ची हॉट कॉफी मारुन पार्किंग मधे कलीगला घेऊन चक्कर मारुन आलो.
पण आता ठरवले आहे……काही तरी केले पाहिजे, जुन्या आयुष्यात परत गेले पाहिजे, का मी जाउ शकत नाही? माझे डेसिग्नेशन मला आडवे येते का?? कोण मला अडवणार? का नाही मी सुखी एवढे पैसे मिळवून, का नाही मला कोण अगदी जवळचा इतके सगळे कलीग असून?
बरेच काही हरवलय........बरेच काही गमावलय.............नक्की कुठे वाट चुकली हे पण कळत नाहीए........गर्दी कुठे तरी जाते म्हणून मी माझे स्वत:चे असे सगळे सोडून गर्दीतला दर्दि झालो..........गर्दी करते ते सगळे नियम पाळायला लागलोय.
कधी तरी या कळपातून वेगळा रस्ता काढून बाहेर जायचे आहे.
बसस्स.......आता ...ठरवले आहे…आणि सुरुवातही केलेली आहे, कलीग म्हणतात हा आज काल वीकेंड ला येत नाही बरोबर, हा थोडा वेगळाच वाटतो आहे, लास्ट वीक म्हणे तेच्या गावी गेला होता तिथे सुट्टी टाकून त्या लोकांबरोबर राहिला. आज काल म्हणे पुन्हा आळंदीला ज्ञानेश्वरांच्या  मंदिरात जातो, ए हा असा का करतो? या वेळी वारीला सासवडपर्यंत पायी गेला होता म्हणे, अजुन काय तर या वेळी म्हणे पुन्हा "घुमाई देवी" च्या यात्रेला  गावी  जाणार आहे, हे हा खरेच असे करणार आहे?
मी थोडा वेगळा झालो आहे, गर्दीत आत्ता थोडी कुर्बुर आहे , अगदी मान खाली घालूनच चालत आहे..........लोक वाट चुकलेला का म्हणेना मला……पण मी मान खाली घालून माझी वाट शोधत आहे.
एकदा विचार करा मित्रांनो या सगळ्या गडबडीत आउटकम काय?? समाजात फक्त आपण आपल्या नावावर काही “स्क्वेअरफूट” घेण्यासाठी धडपडत आहोत काय?? का उगाच फ्रेंड्स ग्रुप वरचे फ्रेंड्स काउंट दाखवून स्वत:चे समाधान करत आहोत काय?

आपलाच...
गर्दीत हरवलेला एक मित्र,